Home राजकीय ‘मैं भी चौकीदार’; मोदींची नवी घोषणा !

‘मैं भी चौकीदार’; मोदींची नवी घोषणा !


pm modi reuters 1

नवी दिल्ली (प्रतिनिधी) ‘चौकीदार चोर हैं’ या तीन शब्दांच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. आज पंतप्रधान मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुरुवात केली.

 

‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय. पण, मी एकटा नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजिक तेढ याविरोधात लढणारा देशातला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय – मी पण चौकीदार’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. या मोहिमेसाठी ‘हा, मैं भी चौकीदार हूँ’ हे गाणंही तयार करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound