नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सत्य जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्यकता आहे, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी स्पष्टपणे नमूद केले. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी काही दिवसांनी पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात येत आहे. लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला पोलिसांविरोधात गुन्हेगारी खटला चालवायचा असेल, तर आम्ही कोणताही आदेश देणार नाही, असेही सरन्यायाधीश बोबडे यांनी पोलीस विभागाला सांगितले. आरोपी सराईत गुन्हेगार होते का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी तेलंगणा पोलिसांना केली. त्यावर आरोपी हे ट्रकचालक आणि क्लीनर होते.