Home क्राईम दोन मुलांना विष पाजून पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या

दोन मुलांना विष पाजून पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या

0
34

1 1
 

सोलापूर (वृत्तसंस्था) बार्शी शहरातील अलीपूर रस्त्यावर ज्ञानेश्वर मठाजवळ दोन मुलांना विष पाजून पती पत्नीने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास भैरवनाथ आणि मनिषा कोकाटे यांनी प्रशांत आणि प्रतिक्षा या आपल्या मुलांना प्रथम विष पाजले. प्रतिक्षा पाचवीत शिक्षण घेत होती, तर प्रशांत नववी इयत्तेत शिकत होता. भैरवनाथ कोकाटे हे बार्शीतच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. कोकाटे पती-पत्नीने आपल्या दोन्ही मुलांना विषप्राशन करायला लावले. त्यानंतर आपल्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर जाऊन खोलीच्या आतून कडी लावली. त्यानंतर एकाच दोरीने पत्नी-पत्नीने गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


Protected Content

Play sound