पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले आहे. आरोपी भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील गणपती माथा वारजे-माळवाडी परिसरात घडली आहे. प्रवीण बाबासाहेब चव्हाण असे आरोपीचे नाव असून पूजा प्रवीण चव्हाण असे मृत तरुणीचे नाव आहे.
घरगुती वादातून दाम्पत्यामध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रागाच्या भरात पतीने डिझेल पत्नीच्या अंगावर ओतले व तिला आग लावली. गंभीर भाजलेल्या पत्नीला त्याने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी रुग्णालयातून पळून गेला. वारजे-माळवाडीचे पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे यांनी सांगितले की, आरोपींच्या अटकेसाठी आम्ही एक पथक तयार केले आहे. मृत महिलेचा भाऊ अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.