यावल प्रतिनिधी । नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी आलेल्या पतीला जेवनात कमी वाढले या रागातून पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना आज सोमवारी १२ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पत्नीने पतीसह सासु व सासरे यांच्याविरोधात यावल पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान या संदर्भातील माहीती अशी की, येथील शहरातील देशमुख वाड्यातील ३२ वर्षीय विवाहितेकडे तिचे अकोला येथील आई वडील आले. असता तालुक्यातील वढोदा येथील विवाहीता मामे बहिणीने पाहूण्यासह येथील मामे बहिणीसह तिच्या पतीसही जेवणाचे आमंत्रण दिले होते जेवणात चिकनचा बेत ठरलेला होता. मात्र जेवण करतांना पती राजास चिकनचे कमी फोडी वाढल्याचा आरोप मेहुण्याने करत रविवारी पत्नीस मार.. ठोक केली. याच कारणावरून सोमवारी सुद्धा पतीने पत्नीस पुन्हा मारहाण केल्याने अखेर संतापलेल्या पत्नीने यावलचे पोलीस स्टेशन गाठले व पतीसह सासू सासरे यांचे विरुद्ध येथील दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांकडुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जेवणात मटणाच्या कमी फोडी वाढल्याचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे यांची सात वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे.