नांद्रा येथील विवाहितेचा २० हजारासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा २० हजार रूपयांसाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ होत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील माहेर असलेल्या काजल चंद्रकांत तायडे (वय२३) यांचा विवाह महाराष्ट्र हौसिंग कॉलनी सातपूर एमआयडीसी नाशिक येथील चंद्रकांत अशोक तायडे यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीलचे काही दिवस चांगले गेल्यानंतर घरातील किरकोळ कारणावरुन सासरच्यांकडून वाद घालीत होते. तसेच तुझ्या वडीलांनी साखरपुडा केला नाही. त्यापोटी तुझ्या माहेरुन २० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केला जात होता. वारंवार होणारा छळ असह्य झाल्याने अखेर विवाहिता माहेरी निघून आली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरुन पती चंद्रकांत अशोक तायडे, सासू शोभा अशोक तायडे, जेठ विशाल अशोक तायडे, आजल सासू पदम मधुकर सपकाळे, मामसासरे विशाल मधूकर सपकाळे सर्व रा. सातपूर नाशिक, नंदोई विठ्ठल डोंगर तायडे, नणंद सोनी विठ्ठल तायडे रा. पिंप्री सिकम ता. भुसावळ यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Protected Content