धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यात मोठा राजकीय उलथापालथ घडली आहे. बाभळे, गारखेडा व शिरसोली प्र.न. येथील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकमुखाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जल्लोषात प्रवेश केला. हा भव्य प्रवेश सोहळा पाळधी येथील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पार पडला.

या प्रवेश कार्यक्रमाच्या सुरुवातीस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. संपूर्ण परिसर “जय भवानी… जय शिवाजी!”, “गुलाबभाऊ तुम आगे बढो… हम तुम्हारें साथ है!” अशा घोषणांनी दुमदुमला. भगवे फडके, ध्वज व शंखनादाने वातावरण पूर्णपणे भगवेमय झालं होतं.

प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून व भगवे रुमाल परिधान करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः स्वागत केलं. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले, “शिवसेना ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून, ती एक जनतेशी नाळ जोडणारी चळवळ आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारी ही संघटना आता गावपातळीवर आणखी मजबूत करण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सर्वांनी एकसंघपणे काम करावे, हेच शिवसेनेचे बळ आहे.”
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत गावोगाव विकासकामांचा जलसिंचन झाला आहे. पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांत झालेली प्रगती डोळ्यासमोर आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने आम्ही प्रभावित झालो असून, शिवसेनेच्या ध्येय-धोरणांशी बांधिलकी मानून आम्ही पक्षात प्रवेश केला आहे.”
या प्रवेशामुळे धरणगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने रचली जात असून, आगामी स्थानिक निवडणुकांत याचा स्पष्ट प्रभाव दिसून येईल, असा विश्वास स्थानिक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
यांचा झाला प्रवेश
गारखेडा येथील प्रवेशकर्ते – बाळकृष्ण प्रताप पाटील (चेअरमन, वि.का. सोसायटी), जगन्नाथ जगन महाजन (माजी चेअरमन, वि.का. सोसायटी), बळीराम भिवसान पाटील (संचालक वि.का. सोसायटी व माजी ग्रामपंचायत सदस्य), नामदेव काशीराम पाटील (संचालक सोसायटी), कैलास शिवराम पाटील (संचालक सोसायटी), बापू हरचंद पाटील (माजी संचालक सोसायटी), बंडू चुडामण पाटील, आनंदा गुलाब भील, प्रताप दगा पाटील, अमोल मधुकर पाटील, साहेबराव भागवत पाटील, अजय अधिकार पाटील, उमेश संजय महाजन, किरण लक्ष्मण पाटील, बाळकृष्ण काशीराम पाटील, अमोल कांतीलाल महाजन, वीरभान हरचंद पाटील, गोरख ताराचंद पाटील, सुनील गोकुळ पाटील, बाळू नामदेव महाजन.
बाभळे येथील प्रवेशकर्ते – सागर पाटील (राष्ट्रवादी तालुका संगटक), भुषण पाटील (उ.बा.ठा गट संगटक), जीजाबराव पाटील (माजी सरपंच), संतोष पाटील, जगदीश पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पाटील, वाल्मीक भास्कर पाटील, गुलाब पाटील, लीलाधर पाटील, संतोष देसले, अधिकार पाटील, राजेंद्र गजरे, गणेश पाटील, विनोद पाटील
याप्रवेश सोहळ्या प्रसंगी युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, धरणगाव नगरपालिकेतील माजी गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उद्योगपती वाल्मीक पाटील, बूट्या पाटील, युवा सेनेचे सोनुभाऊ महाजन, भानुदास भाऊराव पाटील (माजी सरपंच, बाभळे), कमलाकर पाटील (माजी संचालक, गारखेडे सोसायटी), जिजाबराव पाटील (माजी ग्रा.पं. सदस्य), भावेश पाटील (युवा सेना) यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास पाटील यांनी केले. प्रास्ताविक शहर प्रमुख विलास महाजन यांनी तर आभार माजी गट नेते पप्पू भावे यांनी मानले.
शिरसोली प्र.न. येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश
पाळधी येथील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी शिरसोली प्र. न. येथील असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गळ्यात भगवा रुमाल टाकून विधानसभा क्षेत्र प्रमुख श्यामभाऊ कोगटा व युवासेना जिल्हाध्यक्ष रोहितभाऊ कोगटा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रवेशकर्त्यांची नावे – विशाल मोरे, विशाल भिल्ल, प्रशांत पवार, रवींद्र मालचे, अनिल मोरे, प्रविण मोरे, राजू भिल्ल, राजेंद्र भिल्ल, जितू भिल्ल, सोनू मालचे, अजय भिल्ल, विनोद भिल्ल, सोनू मोरे, हुसेन, संदीप, योगेश मोरे, विशाल मोरे, महेश भिल्ल, नितीन भिल्ल, जितू मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



