पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहत पंचवार्षिक निवडणुकीत नम्रता पॅनल विजयी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये 2022-2027 या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहिर झाला. या निवडणुकीत नम्रता पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

याअगोदर दहा जागांसाठी बिनविरोध नम्रता पॅनल उमेदवार निवडून आले होते. ओ.बी.सी. मतदारसंघाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप वाघ यांचे सुपुत्र माजी नगरसेवक भूषण वाघ यांचा ६९ मतांनी विजय झाला.

या निवडणुकीत १४८ पैकी १०२ मतदारांनी आपला  मतदानाचा हक्क बजावला. त्यात एक मत बाद झाले. भूषण वाघ यांच्या विरोधात नंदकुमार सोनार यांना ३२ मतांवर समाधान मानावे लागले. नम्रता पॅनलमध्ये कारखानदार मतदारसंघात पुनमचंद मोर, एकनाथ तावडे, दिलीप मुकुंदराव पाटील, मुकेशकुमार अग्रवाल, सचिन कोठावदे, उमेश राका, रवींद्र देवरे, रेखा माथूरवैश्य, लतादेवी जैन, विक्रांत पेंढारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पाचोरा औद्योगिक वसाहतही कै. के. एम. (बापु) पाटील तसेच बाबुलाल बाजोरिया व शहरातील प्रमुख मान्यवरांच्या कल्पनेतून अथक परिश्रमातून सदर औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली आहे. ही निवडणूक रविवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ८ ते ४ वाजेच्या दरम्यान पार पडली. लागलीच सायंकाळी मतमोजणी होऊन एका जागेसाठी निकाल जाहीर करण्यात आला. यात माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ यांचा विजय झाला.

व्यापारी बांधवांमध्ये पुनमचंद मोर. विजय जैन. भाईदास आग्रवाल, भागचंद राका, सुभाष अग्रवाल, पी.टी.सी. व्हाईस चेअरमन विलास जोशी, प्रकाश एकनाथ पाटील, राजेंद्र बोथरा, जगदीश पटवारी, गोपाल पटवारी, कमल पटवारी, रवी केसवानी, दत्ता जडे,भागवत महालपुरे, पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांचे योगदान लाभले.

या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासाठी हा विजय सहज होता. यावेळी गटनेते संजय वाघ, प्रवक्ते खलील देशमुख, नगरसेवक तालुकाध्यक्ष विकास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, वासुदेव महाजन, नाना देवरे, हारून देशमुख, शशिकांत चंदिले, भगवान मिस्त्री, संजय सूर्यवंशी, रवींद्र देवरे, सचिन कोठावदे, मुकेश अग्रवाल, उमेश राखा, अरुण पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, गोपी पाटील, रोहित वाणी उपस्थित होते. विजयाने भूषण वाघ यांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले.

Protected Content