श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. २५ रोजी, मंगळवारचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता त्यामुळे या योगाची संधी साधत देशभरातील भाविकांनी मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन,अभिषेक-शांती व वैशिष्ट्यपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला.

पहाटे पाच वाजता यजमान बिल्डर व डेव्हलपर प्रशांत निकम मंगळग्रह देवतेची मुख्य व उत्सव मूर्तीवर पंचामृत अभिषेकाचे मानकरी होते. अशी मान्यता आहे की, अंगारकीला ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वी कडे आकर्षित होत असतात .त्यामुळे अंगारकी चतुर्थी धरणाऱ्यांस त्या पुण्यलहरींचा लाभ मिळतो. संकष्टीचा अर्थ दुःखाचा पराभव करणारा असा होतो. भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला समर्पित करण्यात येतो. या दिवशी गणपतीची व हनुमानाचीही पूजा केली जाते.

Protected Content