मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | न्यायालयाकडून भाजप नेत्यांनाच दिलासे कसे मिळतात ? अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी आज न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना न्यायव्यवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या काही काळापासून भाजपच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणार्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का? असा सवाल करतानाच विशिष्ठ राजकीय पक्षाच्या, विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांनाच न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा काम करतात. हे असंच सुरू राहिलं तर देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले की, ज्या गोष्टी पोलीस आणि प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही, त्या आम्ही न्यायालयाकडून करून घेतो. न्यायालयात आमचं वजन आहे. असं कुटे म्हणाले. के कोणत्या प्रकारचं वजन आहे हे काल परवा दिसलं असेलच, असे ते म्हणाले.