चाळीसगाव, प्रतिनिधी | ज्यांनी कधी गरिबी जवळून पाहिली नाही आज तीच लोक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू अशा भूलथापा देत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम ते प्रश्न समजून घ्यावे लागतात. यांनी परिस्थितीचे चटके आयुष्यभर सोसले नाहीत त्यांना जनतेचे प्रश्न कसे कळणार असा घणाघात भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आपल्या प्रचारदौऱ्यानिमित्त केला.
रांजणगाव – पिंपरखेड गटातील रांजणगाव, बाणगाव, लोणजे, खेरडे, तळोदे प्रचा, बोढरे सांगवी येथील प्रचारादरम्यान मंगेश चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रचारात माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेशदादा गुंजाळ, उपसभापती संजय भास्करराव पाटील, माजी पं.स. सदस्य सतीश पाटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य दिनकर राठोड, किशोर पाटील ढोमनेकर, सांगवीचे सरपंच डॉ.महेंद्र राठोड, तळोदे प्रचा सरपंच साहेबराव बाबू राठोड, कैलास गायकवाड, प्रेमचंद खिवसरा, नानाभाऊ पवार, सुरेशभाऊ स्वार, महिला आघाडी अध्यक्षा नमोताई राठोड, सरचिटणीस अनिल नागरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, विनीत राठोड, समाधान शेलार, धनराज शेलार, सुनील पवार, देवा राठोड, सुदाम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीष महाजन व खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रश्न मागील ५ वर्षात मार्गी लागले. काही पूर्णत्वास येत असलेले वरखेडे धरण, शिवाजी महाराज यांचा पुतळा, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर, गाव – वस्ती तांडे यांना पक्के रस्ते, चारही बाजूनी पक्के कॉंक्रिट महामार्ग, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेल्या योजना यामुळे विकासाची गंगा चाळीसगाव तालुक्यात निर्माण झाली आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपली बोटावर सुद्धा मोजण्याइतकी कामे सांगता येत नाहीत, सत्ता असो वा नसो ५ वर्ष राजमहालात राहणारे आज चुकीची दिशाभूल करण्यासाठी लोकांमध्ये मतांचा जोगवा मागत आहेत. केंद्रात आज मोदी सरकार आहे राज्यात देखील महायुतीचेच सरकार येणार आहे. सर्वाना सोबत घेऊन जात–पात–गट–तट यापलीकडे जाऊन केवळ विकासाचे राजकारण करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी ग्रामस्थाना दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र वाडीलाल राठोड, पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, यांनीदेखील भाजपा शासनाच्या काळात या परिसरात झालेली धरणे, रस्ते विविध विकासकामे यांचा लेखा जोखा मांडला.