जळगाव, प्रतिनिधी | घरकूल प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर १० आरोपींवर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते़. त्यापैकी तीन जणांची प्रकृति स्थिर झाल्याने त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली़ असून त्यांची धुळे येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरीत सात जणांवर मात्र अजूनही उपचार सुरु आहेत़.
जळगाव घरकूल प्रकरणाचा निकाल लागल्यापासून १० जणांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते़. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर यातील गुलाबराव देवकर, शिवचरण ढंढोरे आणि सदाशिव ढेकळे या तिघा आरोपींना रुग्णालयातून कारागृहात हलवण्यात आले़ असून पोलीस बंदोबस्तात त्यांना कारागृहात दाखल करण्यात आले़ आहे. याच प्रकरणातील रुग्णालयात उपचार घेणारे दत्तू कोळी, लता भोईटे, साधना कोगटा, सुधा काळे, अलका लढ्ढा, मीना वाणी, विजय कोल्हे यांच्यावर अद्यापही भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरुच आहेत, अशी माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली़ आहे.