चोपडा (प्रतिनिधी) वाढत्या तापमानाचा विचार करता छोटं छोटे पक्ष्यांना पाणी भेटणे अवघड असते. अशा सर्व पक्षांना पाणी मिळावे आणि त्यांचे जीव वाचवावे, या उद्दात हेतूने येथील पद्मावती कलेक्शनचे संचालक सुगनचंद तेजराज बोरा व गहना घर या दुकानाचे संचालक सुशील सोहनराज टाटीया या दोघांनी मिळून अंदाजे १५० मातीचे दानपात्र भारतीय जैन संघटनेला भेट दिले. हे दानपात्र भारतीय जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नुकतेच वाटप केले.
या दानपात्रात एकच पात्रात दोन भाग पाडून एका यांच्यात धान्य दुसऱ्या भागात पुरेसे पाणी ठेवण्याची सोय केली आहे. जवळपास तीन ते चार किलो माती पासून हे पात्र बनविले आहे. कारण हे पात्र जाड असल्याने यात पाणी लवकर गरम होत नाही आणि वजनदार असल्याने एकाच वेळेस अनेक पक्षी बसल्याने देखील ते पात्र उलटे होऊन पाणी व दाणे बाहेर पडत नाही. हे पात्र वाटण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष क्षितिज चोरडिया, सचिव दिनेश लोडाया, कोष्याध्यक्ष निर्मल बोरा, विभागिय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन , सल्लागार दीपक राखेचा, सद्स्य आदेश बरडीया, शुभम राखेचा आदी सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी भारतीय जैन संघटना व दानपात्र देणाऱ्या दात्यांचे समाजाकडून कौतुक होत होते. भारतीय जैन संघटनेने काही दिवसांपूर्वीच फिल्टर आणि थंड पाण्याचा ए.टी.एम. मेन रोडवर बसविले होते. त्यामुळे संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवद्गार अनेकांनी काढले.