Home क्राईम इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे घराला आग

इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे घराला आग


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणाच्या घरात इलेक्ट्रिक मीटरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे बेडरूममध्ये आग लागल्याने लग्नाचे बस्त्याचे कपड, इलेक्ट्रिक सामान, महत्त्वाचे कागदपत्रांसह संसारोपयोगी सामान जळून खाक झाल्याची घटना रविवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. या संदर्भात सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहित अनिल नाईक वय-१९, रा.ईश्वर कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घराच्या मागच्या खोलीत इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रिक साहित्य या त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले बस्त्याचे कापड देखील जळून खाक झाले आहे. या आगीत जवळपास ७० हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. तर मी या घटनेबाबत सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संजीव मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound