हरताळा येथे पावसामुळे कोसळले घर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे पावसामुळे घर कोसळल्याची घटना घडली आहे. हे घर श्रीधर लक्ष्मण दांडगे यांच्या मालकीच्या आहे. हे घर आज सकाळी ३ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे कोसळले.

यात घरातील अन्नधान्य, कुलर, पंखा, मिक्सर, भांडे, जीवनोपयोगी वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंदाजे एक ते दीड लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे. यावेळी तात्काळ हरताळा गावाचे पोलीस पाटील काळे यांनी पाहणी केली असता त्यांनी तलाठी सोमनाथ बोराटकार यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले. या घडलेल्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याचे सांगितले.

Protected Content