नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील एका २४ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साजीद खान सुलतान खान पठाण (वय २४, रा. रहेमतपुरा, नशिराबाद) हा तरुण हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. मंगळवारी ७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास साजीद आपले हॉटेलमधील काम संपवून घरी जात होता. सांवण हॉटेलच्या समोरून जात असताना, सार्वजनिक जागेवर चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा रस्ता आडविला. त्यानंतर कारण नसतांना अज्ञात व्यक्तींनी साजीदला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर साजीदच्या पाठीवर चाकूने दोन वार केले आणि त्याला बेदम मारहाण करत जीवेमारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे करीत आहे.




