
मुंबई (वृत्तसंस्था) नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारने यंदा पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
आजकाल नववर्षासाठी अनेकजण शहरापासून दूरच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे रेस्टॉरंटची गर्दी २५ टक्क्यांपर्यंत कमी असेल असा अंदाज आहे. तरीही मोठी हॉटेले नववर्षाचे स्वागत ग्राहकांसह करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु लहान रेस्टॉरंटमध्ये काहीसा कमी उत्साह असल्याचे दिसून येते. तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये नावाजलेले गायक-गायिकांचे संगीत कार्यक्रम तसेच, डीजेच्या तालावरील पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्या आहेतच; पण लहान रेस्टॉरंटमध्ये गर्दी काही प्रमाणात कमी होईल असे दिसून येत आहे.