जळगाव प्रतिनिधी । गणरायाला अतिशय चैतन्यदायी वातावरणात निरोप देण्यात येत असून केसीई सोसायटीच्या ‘हॉस्टेलचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत तरूणींना धरलेला ठेका लक्षणीय ठरला.
गेल्या अनेक वर्षांपासून केसीई सोसायटीच्या मुलींच्या वसतीगृहातील गणेशोत्सव हा लोकप्रिय ठरला आहे. विशेष करून गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत विद्यार्थीनीचा उत्साह हा पाहण्याजोगा असते. या अनुषंगाने आज विसर्जन मिरवणुकीतही सहभागी झालेल्या विद्यार्थीनींनी धरलेला ठेका पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. होस्टेलचा राजा मंडळाचे हे एकोणाविसावे वर्ष आहे. केसीईच्या हॉस्टेलमध्ये जळगाव जिल्हाच नव्हे तर देशभरातील विद्यार्थीनी शिकण्यासाठी येत असतात. गणेशोत्सवात त्यांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो हे विशेष.
पहा : विसर्जन मिरवणुकीचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2379577918951409
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/746064315837548
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/532452914189482/