महिला पोलिसांचा सन्मान: रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटचा उपक्रम

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटच्या वतीने जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला.

.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ उपस्थित होते. महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फुल, चॉकलेट आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

महिला पोलिसांचे योगदान अमूल्य – संदीप पाटील
PI संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांचे आयुष्यातील महत्त्व आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव केला. ते म्हणाले, “महिला पोलिस अधिकारी वेळेचे बंधन न पाहता कर्तव्य बजावत आहेत, त्यांची भूमिका समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे – API माधुरी बोरसे
API माधुरी बोरसे यांनी महिलांचे जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून सर्व महिलांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी महाजन, तर आभार प्रदर्शन प्रांजळ महिराळे यांनी केले. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटच्या अध्यक्ष भूमिका नाले आणि सचिव निधी पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

सभासदांचा योगदानाने कार्यक्रम यशस्वी
या उपक्रमासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटच्या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी केला. महिला दिनाच्या निमित्ताने पोलिस दलातील महिलांचे योगदान सन्मानित करण्याचा हा स्तुत्य उपक्रम सर्वांनी कौतुकाने पहिला.

Protected Content