रेल्वेतून पडलेल्या चिमुकलीसाठी देवदूत ठरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन दिवसांपुर्वी रेल्वेतुन पडलेल्या चिमकुलीचा जिव वाचविणाऱ्या पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांचा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे सन्मानार्थ सत्कार करण्यात आला.

दोन दिवसापुर्वी जळगाव येथे रेल्वेतून पडलेल्या चिमुकली साठी देवदूत ठरलेल्या पोलीस कर्मचारी फिरोज तडवी जळगाव जिल्ह्यातर्फे करण्यात आला. याप्रसंगी पोलीस बॉईज असोसिएशनचे यावल येथील राहणारे जिल्हा उपाध्यक्ष यावल येथील भूषण नगरे, नदीम शेख, हेमंत तावडे यांच्यासह जिल्ह्यातील असोसिएशनचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले फिरोज तडवी हे पोलीस कर्मचारी शासकीय कामासाठी गुरुवारी २७ जून रोजी पहाटेच्या सुमारास नाशिक जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर उभे होते. या ठिकाणी सेवाग्राम एक्सप्रेस आल्यानंतर त्यातून एक महिला आपल्या दोन मुलांसोबत रेल्वेतून उतरत होत्या. एक चिमुकला कडेवर असताना दोन वर्षाची चिमुकली मात्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळे ती थेट रेल्वे खाली रूळावर जाऊन पडली. त्यामुळे भेदरल्या मातेने एकच आक्रोश सुरू केला. ही घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या फिरोज तडवी यांना समजली. दरम्यान रेल्वेला सिग्नल मिळालेला असताना देखील फिरोज तडवी यांनी आपल्या जीवाची परवा न करता थेट रेल्वे खाली उडी घेतली त्यानंतर रुळावर पडलेली चिमुकलीला सुखरूप बाहेर काढत तिच्या आईच्या ताब्यात दिले. त्यामुळे मराठीत म्हण आहे की देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय उपस्थित्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला पोलीस कर्मचाऱ्यांचे या हिंमतीचे सर्वांनी कौतुक केले.

Protected Content