भडगाव प्रतिनिधी । शहरात नगरपरिषदेने विद्युत वाहनासाठी चार्जिंग सेंटर उभारणी उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत शहरात नगरपरीषद कार्यालय जवळच नगरपरिषदेने विद्युत वाहनासाठी चार्जिंग सेंटर उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी नागरिकांचा सत्कार करून त्यांना कापडी पिशवी देऊन गौरवण्यात आले. नागरिकांनी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले असून याबाबत नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधीक्षक परमेश्वर तावडे, शहर अभियंता रणजित पाटील, पापु. व आरोग्यअभियंता गणेश लाड, कर विभाग प्रमुख अजय लोखंडे, लेखपाल सचिन पगार तसेच नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.