यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव येथील किनगाव रोडवरील इंग्लिश मीडियम रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याने विद्यार्थींचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात पहिल्या पाच क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांनसह भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलचे सचिव व स्वर्गीय केतन मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष पाटील व शाळेच्या व्यवस्थापक पुनम पाटील या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. तसेच राजश्री सुभाष अहिरराव यांची शाळेच्या उपप्राचार्य पदी पदोन्नती झाल्याबद्दल प्राचार्य अशोक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर शालेय जीवनात यशस्वीतेसाठी एका शिपायापासून ते शिक्षकांपर्यंत कोणकोणते योगदान कसे लागते. हे शिक्षक गोपाल चित्ते यांनी पटवून दिले.
त्यानंतर शाळेत नवनियुक्त शिक्षक, कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्राचार्य अशोक पाटील व उपप्राचार्य राजश्री अहिरवार यांनी स्वागत केले. तदनंतर दहावीच्या यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी जीवनात डगमगून न जाता परिस्थितीचा सामना करावा आणि असेच यश यापुढेही मिळवावे, असे प्राचार्य अशोक पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली धांडे यांनी केले तर संपत पावरा व पवन महाजन यांनी आभार व्यक्त केले.
या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक हर्षल मोरे, योगीता बिहारी, दिलीप संगेले, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, दिनकर पाटील, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक एम.तायडे, पुजा डी.शिरोडे, तुषार धांडे, बाळासाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले.