यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात दि.१५ ऑगस्ट रोजी तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणं करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ध्वजाला सलामी देवून मानवंदना दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने तहसीलच्या दालनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशाच्या सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील ५० होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व स्फुल किट वितरण करण्यात आलीत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, नायब तहसीलदार आर डी पाटील, गटशिक्षण अधिकारी नईम शेख, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, भाजपा युवा मोर्चाचे राकेश फेगडे, सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, भाजपाचे विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , कॉंग्रेत कमेटी तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार पाटील यांच्यासह यावल शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. महाले यांनी केले.