जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागचे विद्यार्थी वैशाली भुरे व लखन वाघ यांना बँक ऑफ बडोदाच्या जळगाव क्षत्रिय कार्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यालयाच्या वतीने दरवर्षी हिंदी विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास रूपये ११ हजार आणि स्मृतीचिन्ह व रूपये ७ हजार ५०० व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले जाते. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते मंगळवार दि. १८ ऑक्टोबर रोजी या दोन्ही विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी बडोदा येथील क्षेत्रीय राजभाषा अधिकारी सुकन्या देवी, डीजीटल बँकींगचे अधिकारी निखील वासनिक, गणित प्रशाळेचे संचालक प्रा. एस.आर. चौधरी, भाषा प्रशाळेच्या संचालक प्रा. मुक्ता महाजन हिंदी विभागप्रमुख प्रा. सुनील कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रा. सुनील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रिती सोनी व डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.