जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या, मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) येथे महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने “गुणवंत (प्रथम) विद्यार्थी सत्कार समारंभ” आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सं.ना.भारंबे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास गाजरे उपस्थित होते. विभागात प्रथम विद्यार्थी सत्कार समारंभ हा कार्यक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असून गुणवंत विद्यार्थ्यांना ह्यातून प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाचा उद्धेश आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना विभागप्रमुख प्रा.डॉ. केतन नारखेडे यांनी केली.
सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ.सुहास गाजरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मागर्दर्शन करत असतांना विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात जाण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावे, असे आव्हान केले. डाॅ.गाजरे यांनी आंतरशाखीय शिक्षणाची गरज व महत्व, ए.आय.,मशीन लर्निग, सिग्नल व ईमेल प्रोसेसिंग ईत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा.स.ना.भारंबे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या, पालकांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ट्रेनिंग प्रोग्राम्स, संशोधन प्रकल्प, उद्योजकता ह्या विषयांवर मार्गदर्शन देऊन विभागाचे असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमात एकूण २८ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सूक्ष्मजीवशास्त्र विषयात प्रथम वर्षातील प्रथम पारितोषिक कु.करिश्मा बलराम दर्डा,द्वितीय वर्षातील प्रथम पारितोषिक कु.किरण अविनाश पाटील, तृतीय वर्षातील प्रथम पारितोषिक कु.संयुजा शशीकांत टाकळकर तसेच पदयुत्तर प्रथम वर्षातील प्रथम पारितोषिक कु. आरती कमलाकर लुल्ला,द्वितीय वर्षातील प्रथम पारितोषिक चि.सिद्धेश राजेश वाणी यांना मिळाले.जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर प्रथम वर्षांत कु.अनुष्का देवकृष्णा झेंडे व द्वितीय वर्षात कु. मयुरी सुनील वाणी यांना प्रथम पारितोषिक मिळाले.सदर कार्यक्रमात सन 2023-24 मध्ये पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला, पालकांनी देखील त्यांचा अभिप्राय व्यक्त केला.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अभिजित पाटील यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस्सी.ची विद्यार्थिनी कु. रोशनी परदेशी व शिवानी ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.