जळगाव (प्रतिनिधी) :येथील सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था व युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व समाजातील गुणवंतांचा सन्मान सोहळा रविवार २१ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सर्व समाजातील दहावी व बारावीत ७५ टक्क्यांच्यावर गुण मिळविलेले विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासोबतच कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, आय. टी., डी.एड., बी. एड. , डिप्लोमा, इंजिनेरींग, विधी, पदवी, पदव्युत्तर, आर्किटेकचर, एम. फिल., पी. एच.डी., प्रशासकीय सेवा परीक्षा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ रविवार २१ जुलै रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा हॉल, टेलिफोन ऑफिसच्या मागे येथे पार पडणार आहे. तरी गुणवंतांनी मार्कशीटची झेरॉक्स सुनील मेडिकल, नवीन बस स्टँडच्या मागे येथे जमा करावेत असे आवाहन आयोजक माजी महापौर तथा फाऊंडेशनचे आध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी केले आहे.