यावल–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील व मित्रपरिवार तसेच साकळी ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त साकळीसह परिसरातील तसेच यावल येथील पत्रकारांचा सन्मान सोहळा घेण्यात आला.
ग्रामपंचायतच्या सभागृहात संपन्न झालेल्या या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमा प्रसंगी तालुक्यातील २५ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रात सरपंच दिपक पाटील व मित्र परिवार तसेच साकळी परिसर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात दुपारी दोन वाजेपर्यंत २६ रक्तदात्यांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केले.संजीवनी ब्लड सेंटर,फैजपूर यांनी रक्त संकलन केले.पत्रकार दिनानिमित्त साकळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांचा प्रथमच गौरव करण्यात आला ही अतिशय प्रशंसनिय बाब ठरली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच नूर बी तस्लिम खान,ग्रामविकास अधिकारी पी.आर.धनगर,सामाजिक कार्यकर्ते के.बी.खान,ग्रामपंचायत सदस्य खतिब तडवी,माजी उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य फक्रृद्दीन खान कुरेशी, परमानंद बडगुजर, नरेंद्र मराठे, शे.बिस्मिल्ला शे.रहेमान (बाबा मेंबर ),अकबर शेख हुसेन,विनोद खेवलकर, मुकेश बोरसे,माजी ग्रा.पं.सदस्य राजु सोनवणे तसेच सलीम शेख, मुकेश खेवलकर, सचिन कोळी, उमेश बडगुजर,योगेश कुंभार तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित पत्रकार अय्युब पटेल,पत्रकार सुधीर चौधरी , पत्रकार शेखर पटेल, पत्रकार सुनिल गावडे, पत्रकार चंदु नेवे, पत्रकार जिवन चौधरी,पत्रकार रणजीत भालेराव, शब्बीर खान,गोकुळ तायडे,ए टी चौधरी,फिरोज तडवी,विक्की वानखेडे यांच्यासह परिसरातील पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सरपंच दिपक पाटील यांचे अध्यक्षिय भाषण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे व मिलिंद जंजाळे यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी धनगर साहेब यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी ग्रामविकास अधिकारी पी.आर.धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,पंढरीनाथ माळी, रोजगार सेवक धमेंद्र पाटील यांचेसह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.