पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेत प्रवास करतांना एका प्रवाशाचा मोबाईल शौचालयात अनावधानाने राहुन गेला होता. दरम्यान त्याच रेल्वेतुन कोपरगाव ते अहिल्यानगर रेल्वे स्थानका दरम्यान पाचोऱ्यातील तरुण प्रवास करित असतांना शौचालयास गेला असता त्यास मोबाईल आढळुन आला. तरुणाने तात्काळ आरपीएफ यांना संपर्क साधला. आरपीएफ हे घटनास्थळी दाखल होवुन शहानिशा करून मुळ मालकास मोबाईल सुपुर्द केला.
पाचोरा येथील वकील अॅड. शांतीलाल सैंदाणे यांचा मुलगा रोहित शांतीलाल सैंदाणे हा जम्मु ते पुणे जाणाऱ्या १०७७ अप झेलम एक्सप्रेस मध्ये एस. ३ बोगीत पाचोरा रेल्वे स्थानकावरुन बसला. कोपरगाव ते अहिल्यानगर रेल्वे स्थानका दरम्यान एका प्रवाशाचा महागडा मोबाईल झेलम एक्सप्रेसच्या शौचालयात अनावधानाने राहुन गेला. काही वेळाने रोहीत सैंदाने हा तरुण शौचालयास गेला असता रोहित यास मोबाईल मिळुन आला. रोहितने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली असता रेल्वे पोलिस तात्काळ एस. ३ बोगीत दाखल होवुन मोबाईलची शहानिशा करून मुळ मालकास परत केला. रोहित सैदांने याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.