धरणगाव प्रतिनिधी । दारूच्या दुकानावर पुन्हा कारवाई करून नये यासाठी अडीच हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकासह होमगार्ड यांना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे धरणगाव तालुक्यातील रहिवाशी आहे. तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करणेकामी व तक्रारदार यांच्या दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (वय-३७) रा. संत मिराबाई पिंप्राळा शिवार याने अडीच हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार याने स्थानिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी १ वाजेच्या सुमारास होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (वय-२५) रा. सोनवद ता. धरणगाव याच्या मदतीने अडीच हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधिक्षक सतीष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव,पो.नि. लोधी, सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोना जनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली आहे.