जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात ११ जूलै रोजी सकाळी ७ वाजता होमगार्ड भरती होणार असल्याची बातमी सोशल मिडीयातून व्हायरल होत आहे. परंतू अशा प्रकारची कोणतीही भरती होत नसल्याची माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाकडून मिळाली आहे.
मागील एक-दोन दिवसापासून जिल्ह्यात ११ जूलै रोजी सकाळी ७ वाजता होमगार्ड भरती होणार असल्याची बातमी सोशल मिडीयातून व्हायरल होत आहे. परंतू जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाकडून नवीन भरतीबाबत बातमी अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मिडीयातून भरतीबाबत व्हायरल होणारी बातमी, माहिती ही केवळ अफवा आहे. त्यामुळे उमेदवारांनी अफवांना बळी पडू नये. तसेच कुठल्याही प्रकारची भारती नसल्याची नोंद घ्यावी, असे होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी कळवले आहे.