मुक्ताईनगरात स्वच्छता करून साजरा होमगार्ड दिन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ८ डिसेंबर 1946 साले गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्ताने जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशाने व प्रशासकीय अधिकारी काळे व केंद्रनायक संदीप तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार मुक्ताईनगर तालुका समादेशक विकास रामचंद्र जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड पथकाने शहरातील मुख्य रस्त्यावर परिवर्तन चौक मुक्ताई चौक गजानन महाराज मंदिर तहसील कार्यालय व परेड पथ संचालन पोलीस कार्यालय मैदान तसेच पोलीस स्टेशन या ठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आले.

विकास जुमळे, मोतीलाल डहाके, देवेंद्र काटे, शेखलाल बागवान, सिद्धार्थ धुंदे, शिवदास पाटील, सुभाष सोनवणे, सोपान बेलदार, ज्ञानेश्वर ढोके, गजानन ढोके, बाळू मेरे, विजय गवळी, गजानन मराठे, प्रशांत पाटील, कनया बोदडे, विशाल घोगरे, अक्षय वाघ, राहुल सणांसे, महिला होमगार्ड कल्पना तायडे, कल्पना तिवणक,र निशिगंधा हरकरे, भारती दाभाडे, वंदना जाधव, नर्मदा भोई उपस्थित होते.

Protected Content