जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। घरफोडीच्या गुनह्यातील सराईत गुन्हेगाराला रेल्वे स्थानक परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सायबुद्दीन उर्फ सायबू शेख नजमोद्दीन (रा. परपोट मोहल्ला, नशिराबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा शहरातील रेल्वे स्थानक परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, प्रितम पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, भरत पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयित सायबुद्दीन उर्फ सायबू शेख नजमोद्दीन याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गेल्या १० महिन्यांपुर्वी नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासाकरीता नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.