सर्फिग करताना शार्कच्या हल्ल्यात हॉलीवुड अभिनेत्याचे निधन

हवाई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ स्टार व सर्फिंग इन्स्ट्रक्टर तामायो पेरी याचं हवाईमध्ये निधन झाले आहे. रविवारी २३ जून रोजी त्याच्यावर शार्कने जीवघेणा हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तामायो ४९ वर्षांचा होता. त्याच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर चाहते शोक व्यक्त करत आहेत. ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ शिवाय ‘ब्लू क्रश’ आणि ‘चार्लीज एंजल्स: फुल थ्रॉटल’ मधील भूमिकांसाठी तामायो ओळखला जायचा. रविवारी दुपारी गोट आयलँडजवळ शार्कने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी माहिती होनोलुलु इमर्जेन्सी मेडिकल सर्व्हिसने दिली आहे.

ओशन सेफ्टी लाइफगार्ड आणि सर्फिंग इंस्ट्रक्टर तामायो पेरी याच्यावर हवाईमध्ये गोट आयलँडजवळ एका शार्कने हल्ला केला. एका व्यक्तीने पेरीला पाहिलं आणि इमर्जेन्सी सर्व्हिसेसला कळवलं, त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्याला जेट स्कीने सुमद्रकिनाऱ्यावर आणलं, पण तिथेच त्याला मृत घोषित करण्यात आलं, असं वृत्त स्काय न्यूजने दिलं आहे. अभिनेत्याच्या शरीरावर शार्क चावल्याच्या खूप जखमा असल्याचं दिसून आलं आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांनी परिसरात शार्कपासून सावध राहण्याच्या सूचना लोकांना दिल्या आहेत. अभिनेता म्हणून काम करणारा तामायो पेरीने सर्फिंग इन्स्ट्रक्टरदेकील होता. आधी तो समुद्र किनाऱ्यावर लाइफगार्ड म्हणून काम करायचा. नंतर आठ वर्षांपूर्वी २०१६ पासून तो ओशन सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. तो या टीमचा सर्वात चांगला सदस्य होता, असं म्हणत शहराच्या महापौरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Protected Content