जळगाव, दिनांक २६ (प्रतिनिधी ) : शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आयोजीत होळी धमाका कार्यक्रमाला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील शेकडो आबालवृध्दांनी येथे संगीताच्या तालावर पर्यावरण पूरक रंगोत्सव साजरा केला.
खान्देशातील एकमात्र मोठ्या असणार्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होळीनिमित्त दिनांक २५ रोजी होळी धमाका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. यात गीत-संगिताच्या तालावर रंगोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. यानुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेला धमाल उत्सव सायंकाळी पाच पर्यंत सुरू होता.
अँकर्सनी आणली रंगत
होळी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून ख्यातनाम अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपल्या अतिशय बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली. विविध गेम्स आणि क्वीझच्या माध्यमातून त्यांनी आबालवृध्दांना खिळवून ठेवले. तर खास कपल्ससाठी त्यांनी विविध मनोरंजनपर गेम्स सादर केले असता याला देखील उदंड प्रतिसाद लाभला.
ढोल बनले आकर्षणाचा केंद्रबिंदू
या कार्यक्रमासाठी खास दिल्ली धमाका ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने ठिकठिकाणी जाऊन केलेल्या सादरीकरणाला अतिशय उत्स्फुर्त अशी दाद मिळाली. विशेष करून पंजाबी भांगड्यापासून ते अस्सल मराठी ठेक्यावर उपस्थितांनी जोरदार नृत्य करून होळीचा आनंद लुटला. झुलेलाल वॉटर पार्कचा परिसर हा ढोलच्या ध्वनीने दुमदुमल्याचे दिसून आले.
चोख व्यवस्था
दरम्यान, झुलेलाल वॉटर पार्कमध्ये येणार्या विविध वयोगटातील ग्राहकांसाठी येथे अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एंट्री केल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत त्यांना येथे आनंद लुटता यावा म्हणून प्रशिक्षित कर्मचार्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे येथील फुड जंक्शनमध्ये विविध स्वादीष्ट डिशेश वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे वॉटरपार्कच्या धमाल मस्तीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
लवकरच सुरू होणार वेव्ह पूल
झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आता वेव्ह पुल उभारण्यात येत आहे. या माध्यमातून खान्देशातील नागरिकांनी वाजवी दरात अतिशय कडक उन्हात लाटांचा आनंद घेता येणार आहे. याच्या जोडीला अद्ययावत गेम्सच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अजून एक नवे मनोरंजनाचे दाल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती झुलेलाल वॉटर पार्क कंपनीचे संचालक निरज जेसवानी यांनी दिली आहे. झुलेलाल वॉटर पार्कच्या नोंदणीसाठी 98 90 77 08 59 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.