जळगाव प्रतिनिधी | शहरातील बळीरामपेठ परिसरात मुख्य रस्त्यावर असलेले होजीअरी शॉप तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीसांच्या पथकाने एका अल्पवयीन बालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बळीराम पेठेत श्री साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मयूर कुकरेजा यांच्या मालकीचे ओम स्पोर्ट्स एनएक्स हे दुकान आहे. बुधवार दि.१७ रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुकान फोडून दीड ते दोन लाखांची रोकड लंपास केली होती. हा सर्व प्रकार बुधवार दि.१८ रोजी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट दिली होती. उपअधीक्षक नीलाभ रोहन यांनी यांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत संशयित आरोपी मोहम्मद अकबर कादर तडवी (वय-१९) व एका विधीसंघर्ष बालक असे दोघांना ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरी केलेली दीड लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी रतन गिते व तेजस मराठे यांना संशयितांची माहिती मिळाली होती. या पथकत सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, अक्रम शेख, विजय निकुंभ, सुनील पाटील, गणेश शिरसाळे, दीपक सोनवणे, गणेश पाटील, सुधीर साळवे, नवजीत चौधरी, प्रणेश ठाकूर, रविंद्र साबळे, योगेश इंधाटे, निलेश पाटील, उमाळे आदीचा समावेश होता.