पेट्रोलपंपावर होर्डीग कोसळले; ५४ जण जखमी ९० अजूनही पंपाखाली

मुंबई-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | मुंबईत आलेल्या अवकाळी पाऊसामुळे व जोरदार वाहणाऱ्या वारांमुळे मोठी दूर्घटना घडली आहे. घाटकोपरमधील छेडानगरातील एका मोठया पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेले होर्डीग हे पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळले आहे. त्यामुळे पेट्रोल पंप हे होर्डीग खाली गेले आहे. त्यावेळी या पंपावर १०० पेक्षा जास्त जण होते. पाऊसापासून वाचण्यासाठी काही लोक पंपाजवळ उभे होते तर काही आपली वाहने घेऊन पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपावर आले होते. त्यामुळे पंपावर गर्दी होती. असे असताना अचानक होर्डींग पंपावर कोसळले. त्यामुळे या घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

ही घटना १३ मे रोजी आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५४ जण या घटनेत जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सर्व जखमींना जवळील राजापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही ९० नागरीक पेट्रोल पंपावर खाली अडकल्याचा अंदाज आहे. तसेच 10 ते 12 मोठ्या गाड्या या अडकल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेकडून बचाव कार्य सुरु आहे. पण आता एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून मोठमोठ्या क्रेन घटनास्थळी आणण्यात आल्या आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जवळपास 18 ते 20 रुग्णवाहिका आणण्यात आल्या आहेत. घटनास्थळी अनेक बडे नेते येऊन गेले आहेत. बचाव कार्य सुरू आहे.

Protected Content