एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरीने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने वाहनातील दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज रमेश पाटील (वय-३५) रा. सावखेडा ता. पारोळा हा तरूण हिरालाल अशोक पाटील यांच्या सोबत ॲक्वा पाणी वाटपाचे काम करतात. मंगळवार ५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघे त्यांच्या मालकीचे (एमएची १९ बीएम ५८६४) चारचाकी वाहनातून पाणी वाटपाचे काम करत होते. राष्ट्रीय महामार्गावरील पंजाब ढाव्यावर पाणी वाटप करतांना भरधाव वेगाने येणारी लक्झारी (एमएच १९ सीवाय ९०२७) ने जोरदार धडक दिली. या अपघातात धनराज पाटील आणि हिरालाल पाटील हे दोघे जखमी झाले. तर वाहनाचे मोठे नुकसान केले आहे. याबाबत धनराज पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे.