आता मोबाईलवर पाहता येईल भारताचे ऐतिहासिक दस्ताऐवज

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या वारशाच्या दस्तऐवजाचा खजिना खुला होणार आहे. अभिलेख कक्षाने दरमहा दीड कोटी दस्तऐवज डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवले. अमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहालयात १० कोटी दस्तऐवज डिजिटल आहेत. भारत पुढील चार महिन्यांमध्येच अमेरिकेला मागे टाकून डिजिटल दस्तऐवजात प्रथम स्थान मिळवणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना झाशीच्या राणीचे शेत, इंग्रजांच्या काळातील दस्तऐवज, मोगल आणि तुघलक राजवटीच्या फतव्यांसारखे दुर्मिळ कागदपत्रे मोबाइल व लॅपटॉपवर पाहावयास मिळणार आहेत. ३४ कोटी दस्तऐवजांची डिजिटल कॉपी भारतीय अभिलेखागार लवकरच आपल्या वेबसाइटवर अपलोड करणार आहे. डिजिटलायझेशनसाठी १,००० तज्ज्ञांची टीम विविध पाळ्यांमध्ये २४ तास काम करत आहे. दस्तऐवजांना अभिलेख कक्षाच्या हेरिटेज इमारतीतून अॅनेक्झीपर्यंत नेण्यासाठी एसी कॉरिडॉर बनवला आहे. ३४ कोटी दस्तऐवजांचे डिजिटलायझेशन होण्यासाठी ३८ वर्षे लागली असती.

Protected Content