चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणेसीम येथील ग्रामस्थांनी अवैध वाळू उपशाच्या निषेधार्थ सुरू केलेले उपोषण उपोषण सायंकाळी सोडले.
याबाबत माहिती अशी की, हिंगोणेसीम (ता. चाळीसगाव) येथील नदीपात्र वाळू तस्करांनी अक्षरश: ओरबडून घेतले आहे. येथून किमान ३०० कोटी रूपयांची वाळू वाहून नेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात मात्र कमी रकमेची वाळू दाखविण्यात आली आहे. यामुळे राजकीय वरदहस्त असणार्या वाळू तस्करांना प्रशासनाचा वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी हिंगोणेसीम ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. आजदेखील हे उपोषण सुरूच होते.
दरम्यान, आमदार उन्मेष पाटील यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी शरद पवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने कारवाईस प्रारंभ केल्याची माहिती दिली. संबंधीत वाळू तस्करावर तब्बल ६.८८ कोटी रूपयांचा दंड लावण्यात आला असून त्याच्याविरूध्द एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील देण्यात आली. यामुळे हिंगणेसीम ग्रामस्थांनी आपले उपोषण सायंकाळी सोडले.
ताजे अपडेट – प्रांताधिकार्यांशी झालेल्या चर्चेनंतर आज सायंकाळी हिंगणेसीम ग्रामस्थांनी उपोषणाची सांगता केली.
पहा:– उपोषणकर्ते नेमके काय म्हणतात ते !