Home राजकीय सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही : संजय राऊत

सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही : संजय राऊत


sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर राऊत यांनी आज पहिल्यांदा राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.

 

यावेळी राऊत म्हणाले की, नव्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असून जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार येणार असेल तर हिंदुत्व त्याच्या आड येणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जी युती होती त्यात आता फाटाफूट झालेली आहे. आम्ही महाशिवआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेले नाही. त्यामुळे या नव्या आघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यपालांनी सर्वांवर अन्याय केला असा आरोप करताना भाजपावरही त्यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली. भाजपाने शब्द देऊनही पाळला नाही तसेच मध्यावधी निवडणुकीचा दावा नाकारत भाजपा इतरांना सत्ता स्थापन करु देत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.


Protected Content

Play sound