फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ द्वारा संचलित धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत हिंदी दिवसाचे औचित्य साधत हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याचनिमित्ताने ‘राष्ट्रीय सामाजिक एकात्मता’ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी ‘सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर अत्यंत कल्पकतेने रंगांच्या माध्यमातून चित्रित केले. या सप्ताहाच्या निमित्ताने मेहंदी स्पर्धा, राष्ट्रविकास मे राष्ट्र भाषा हिंदी का योगदान या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धेसाठी मीडिया और हिंदी, राष्ट्र विकास मे युवा असे विषय देण्यात आले आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाची आवड व प्रचार प्रसार व्हावा, हा त्यामागच्या उद्देश आहे. यासाठी तापी परिसर विद्या मंडळ, व्यवस्थापन मंडळ, प्रशासन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, विभाग प्रमुख डॉ. कल्पना पाटील, विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभाग प्रमुख डॉ. कल्पना पाटील, डॉ. आय. पी. ठाकूर, डॉ. विजय सोनजे, प्रा. सतीश पाटील, डॉ. सिंधु भंगाळे, प्रा. सुजाता भंगाळे यांनी परिश्रम घेतले.