यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाजाचे,कला, वाणिज्य व विज्ञान महा विद्यालय,यावल येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालया च्या प्र.प्राचार्य संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी भाषा मे रोजगार या विषयावर घेण्यात येणाऱ्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक बारेला रश्मी ताशा (टी. वाय. बी. ए.), द्वितीय क्रमांक साळवे तनिशा किरण (एफ. वाय. बी. ए.) व तृतीय क्रमांक अश्विनी रमेश धनगर या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुधीर कापडे, प्रा.डॉ.पी. व्ही.पावरा, प्रा.डॉ.हेमंत भंगाळे, प्रा.डॉ.आर.डी.पवार, प्रा.प्रतिभा रावते तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.