नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील हिजाब बंदीला दिलेल्या आव्हानावर निकाल देतांना आता हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे निर्देश दिले आहेत.
कर्नाटक राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लीम महिला घालत असणार्या हिजाबला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सकाळी निकाल आला. यात न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश सुधांशु धुलिया यांच्या खंडपिठाचे निकालावर एकमत झाले नाही. गुप्ता यांनी बंदीच्या बाजूने तर धुलीया यांनी विरूध्द मत दिले. यामुळे आता हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. यात तीन न्यायमूर्तींचा समावेश राहील असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे आता हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिजाब प्रकरणातील या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता हे प्रकरण नव्याने खंडपिठासमोर जाणार असल्याने याच्या निकालासाठी विलंब लागणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.