एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक ठार व चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर हायवेवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर या अपघातानंतर एरंडोलकांचा मोठा संताप दिसून आला.
एरंडोल – पारोळा कडून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने रस्ता ओलांडणार्या तीन जणांना वाचवण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात जितेंद्र भालेराव वय ( ३० ) वर्षे राहणार धरणगाव हा जागीच ठार झाला दुर्घटना एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अंमळनेर नाक्या नजीक १० जानेवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली.
यावेळी संतप्त जमावाने गतिरोधक उड्डाणपूल सर्कल अंडर बायपास तसेच जेसीबी बोलावून रस्ता तात्काळ हायवे कोरण्याची मागणी केली. हजारोच्या संख्येने महामार्गावर जमलेल्या जमावाने रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन जवळपास दहा वाजे नंतरही सुरू होते दरम्यान काही नागरिकांनी जेसीबी आणून रस्ते महामार्ग क्रमांक सहा खोल चारी खोदली. या आंदोलनामुळे महामार्गाच्या सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या परिणामी महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली.
एमएच ४८ Aएटी ७६८२ क्रमांकाच्या बारा चाकी ट्रक भरधाव वेगाने पारोळा कडून येत असताना एमएच १९ बीके ०४४२ या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक जितेंद्र भालेराव (वय तीस वर्ष राहणार धरणगाव) हा जागीच ठार झाला तर धनंजय साठे (वय ४० वर्ष राहणार धरणगाव) यांच्यासह शाहरुख पठाण व ( य २८ वर्ष राहणार एरंडोल); बाळू पवार (वय २४ वर्ष राहणार एरंडोल) आणि कैलास पवार (वय २५ वर्ष राहणार एरंडोल) हे जखमी झाले आहेत.
सर्व जखमी एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी नेण्याकरता कॉंग्रेसचे राज्य प्रतिनिधी विजय महाजन व परिसरातील नागरिकांनी मदत केली. तसेच आंदोलन वेळी अमित पाटील प्राध्यापक मनोज पाटील, एस. आर. पाटील व इतर प्रतिष्ठितांनी मदत कार्य केले. याप्रसंगी, पोलीस निरीक्षक सतीश बोराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकार्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तथापि, रात्री उशीरापर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली नव्हती.
दरम्यान, याप्रसंगी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका पालकाने माझी मुलगी सकाळी महामार्ग ओलांडांना थोडक्यात वाचली अशी संतप्त भावना बोलून दाखवली. तसेच,दोन दिवसापूर्वी शाळकरी मुलगा महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली असून तो गंभीरजखमी झाला असून उपचार घेत असल्याचेही सांगण्यात आले.