जळगाव (प्रतिनिधी ): हुडकोच्या थकीत कर्जच्या वसुलीसाठी हुडकोच्या लीगल सेलने पाठविलेल्या नोटिसमुळे जळगाव मनपाची खाते सील झाली असली तरी यावर हाय कोर्टात २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यादिवशी जळगावकरांचे वितव्य ठरणार आहे. तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खाती सील झाल्यामुळे महापालिकेच्या अडचणीत वाढ होणार आहे.
राज्य शासनाने हमी दिलेल्या हुडकोच्या कर्जाची परत फेड होत नसल्याने जळगाव महापालिकेवर नामुष्की ओठावली आहे . दि २६ रोजी हुडकोच्या लीगल सेलने मनपाच्या खात्याची माहिती मागविली आहे.त्यामुळे मनपाच्या अडचणीत वाढ झाली आहे.मनपाने याप्रकरणी यापूर् च हाय कोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायालयात सर्व परिस्थिती सांगितली असून न्यायालयाने २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. याआधी दोन वेळा या कर्ज संदर्भात रिसेटलमेन्ट झाले आहे. याची सर्व माहिती शासनाला देण्यात येणार आहे असे एक अधिकाऱ्याने सांगितले आहे. मनपाच्या तीन बँक अहलाबाद बँक,असिक्स बँक, एचडी एफ सी बँक यामधील ४० खाते सील झाल्याने १४ वा वित्त आयोग,प्रॉपर्टी टॅक्स, पेशन्स व वेतन ,शिक्षण मंडळ, शासकीय निधी यावर परिणाम होणार आहे. खाते सील झाल्यामुळे गेल्यावेळेस शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती मनपावर ओढवली आहे त्यात पावसाळा असल्याने चगल्याचं अडचणी निर्माण होतील.