जळगाव प्रतिनिधी । प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भानदेखील गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी केले. ते मु.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग व शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी जनसंपर्क व त्याचे आयाम या विषयावर केसीई सोसयटी व मू.जे.महाविद्यालय यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना बागुल म्हाणाले कि, जनसंपर्क म्हणजे लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून विचारांचे आदान-प्रदान करणे हे जरी गरजेचे असले तरी समाजात वावरताना ज्ञानासोबत परिस्थितीनुरूप भान असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्रभावी जनसंपर्काचा हा मुख्य स्त्रोत आहे हे विसरता कामा नये. स्वतःचे विचार मांडण्यासाठी आज सोशल मिडिया सारखे प्रगल्भ व्यासपीठ उपल्ब्ध झाले आहे. मात्र यातून कमाल आणि किमान ज्ञान कोणते आणि ते कसे घ्यावे हे देखील तितकेच गरजेचे आहे. सध्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली असून प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याने करियरच्या संधी आजचा युवकाला गवसत नाही. सोशल मिडिया हाताळताना तसेच अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत जगात काय घडते आहे याची सखोल व खडा-खडा माहिती आजच्या युवकाला असल्यास तो करियर ची संधी स्वतःसाठी निर्माण करू शकतो असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना मांडले.
यावेळी केसीई सोसायटीचे सहसचिव अॅड. पी.एन.पाटील, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, केसीईचे अकॅडमिक डायरेक्टर दिलीप हुंडीवाले, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आर.राणे, ऑटोनॉमस इंचार्ज डॉ.एस.एन.भारंबे, विभागप्रमुख संदीप केदार, सुभाष तळेले, जैन इरिगेशनच्या जनसंपर्क विभागातील किशोर कुलकर्णी तसेच प्रा.शमा सराफ, के.जी.कुलकर्णी तसेच हेमराज बागुल यांच्या सुविद्य पत्नी नीता बागुल,प्रा.प्रशांत सोनवणे, प्रा.केतकी सोनार, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .प्रास्ताविक प्राचार्य उदय कुलकर्णी,सुत्रसंचालन अपूर्वा वाणी,मान्यवरांचा परिचय विभागप्रमुख प्रा.संदीप केदार व आभार ए.आर.राणे यांनी मानले.