धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कधी नव्हे इतक्या भयंकर दुष्काळाला धरणगाव शहरासह तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.दुष्काळाबाबत शिवसेनेने वेळोवेळी वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. परंतू जिल्ह्य़ातील तीनही मंत्र्यांनी याबाबत दुर्लक्ष केले.त्यात जिल्ह्य़ातील तीनही मंत्री अपयशी ठरलेत.तीनही मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.विधायक विकास साधायचा असेल तर त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, दृष्टीहिन असून चालत नाही. शेतकरी वाऱ्यावर सोडून जिल्हा पोरका झाल्याची भावना नागरिकांना मध्ये आहे.याचे दुरोगामी परिणाम येणाऱ्या विधानसभेत निश्चितच दिसतील हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज नाही.ज्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले त्यांना जनता आता रस्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाहीत.अशी कुजबुज जनमानसात सुरू आहे.त्याचे प्रतिबिंब लोकसभेच्या निमित्ताने निकालांमध्ये दिसून येईलच.
धरणगावचा समावेश हेतुपुरस्सर दुष्काळात न करता दुष्काळसदृश मध्ये करून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.दुष्काळसदृश व निधी अदृश्य असा नवा पायंडा जिल्ह्यात पाडण्यात आला आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे,जनावरांना चारा छावण्या,सहकारी कर्जाचे पुनग॔ठन,शेतीच्या संबंधित कर्जाची वसुली स्थगित करणे,विद्यार्थी वर्गाचे परीक्षा शुल्क परत मिळणे,पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करणे,मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरी मिळणे,नवीन बोअरवेलचे प्रस्ताव सादर करणे,चारासाठी बियाणे मिळणे,तालुक्यातील गावांमध्ये ५०पैशांच्या आत आणेवारी कमी करून जाहीर करणे तसेच दुष्काळसदृश शब्द वगळून संपूर्ण दुष्काळ जाहीर करणे.आदी मागण्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आल्या.
केळी फळपिकाला पीकविमा दिला जातो याचा आम्हाला आनंदच आहे. परंतू कापूस तसेच इतर पीकांच्या बाबतीत सापत्न वागणूक का?कापूस पिकांसह इतर पिकांचा पिकविमा अद्याप मिळालेला नाही तो शेतकऱ्यांना देण्यात यावा. सध्या पेरणीचा हंगाम सुरू होत आहे.त्यासाठी बी बियाणे व खतांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तो रोखण्यात येवून शेतकऱ्यांना बियाणे तसेच खते मुबलक व सुलभ पध्दतीने उपलब्ध करावीत. आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्याबाबत धरणगाव तहसीलदार मा. महेंद्र सुर्यवंशी व तालुका कृषी आधिकारी मा.चंद्रकांत देशमाने यांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघसाहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी तालुकाप्रमुख जयदीप पाटील,राजेंद्र ठाकरे,कृपाराम महाजन ,भागवत चौधरी, जितूभाऊ धनगर,किरण भाऊसाहेब ,संतोष सोनवणे, हेमंत महाजन, रमेश पांडे ,रणजित पुरभे,करीम लाला,शरीफ भाई,नदीम भाई,वसिम कुरेशी,राहूल रोकडे, रणजित सिकरवार ,अरूण पाटील सह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.