पहूर, ता. जामनेर- रविंद्र लाठे | येथील पोलीस स्टेशन मध्ये सफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्या नंतर त्याच्या कुटुंबीयांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने ५१ हजार रूपयांची मदत देण्यात आली असून याचे परिसरातून कौतुक होत आहे.
हिच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे |
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ॥
या ओळींची अनुभूती व्हावी, असा प्रसंग पोलीस स्टेशन ला घडला. पहूर पोलीस स्टेशन मध्ये सफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्या नंतर त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देताना खाकी वदतील माणुसकीचे दर्शन पहूरकरांना अनुभवाला मिळाले.
शुक्रवारी पहूर पोलीस स्टेशनच्या वतीने सफाई कर्मचारी विजय गोयर यांचा दुर्दैवी अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना 51 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली .यावेळी पहूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन सानप ,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह अधिकारी, अंमलदार, मयत विजय गोयर यांच्या पत्नी ,आई ,भाऊ यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते .
पोलिसांच्या दातृत्वाचे कौतुक
पहूर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले सफाई कर्मचारी विजय दिलीप गोयर यांचा अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारास पहूर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्याच्या घरच्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणून 51 हजार रुपये जमा करण्यात आले.
यानंतर, मयत विजय दिलीप भोयर यांच्या पत्नी राधिका विजय गोयल व त्याची आई यांना पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी त्यांना पहूर पोलीस स्टेशन येथे बोलावून सदर 51 हजार रुपयांची मदत सुपूर्द केली पोलिसांच्या या दातृत्वाचे पहूर सह परिसरात विशेष कौतुक होत आहे.