जळगाव, प्रतिनिधी | २ सप्टेबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. यावर्षी महापालिकेतर्फे हा गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असून ही रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार असल्याचे महापौर सिमा भोळे यांचे मार्फत कळविण्यात आले आहे.
शहरात विविध मंडळे, आस्थापनांसह जळगाव शहर महापालिका देखिल सर्वप्रथम मानाचा गणपती श्रीं ची पदस्थापना मनपा प्रशासकिय इमारतीत भव्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह आयोजित करण्यात येत असते. मात्र सद्यस्थिती संपूर्ण महाराष्ट्रासह विशेषत: कोल्हापुर मुसळधार व संतधार पावसामुळे पुर वाढून अनेक बंधू-भगिनी यांना सदर पुरात जिव गमवावा लागला असून हजारो कुटूंब आज सुध्दा बेघर आहेत. यामुळे यावर्षी जळगाव महापालिकेचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असून सदर उत्सावासाठी जमा होणारी रक्कम ही पुरग्रस्त बांधवांना मदत देण्यात येणार आहे.