धरणगाव (प्रतिनिधी) आज सकाळी शहरातील गुरव गल्लीतील एका घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते. परंतू शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आपदग्रस्त कुटुंबास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला.
या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी साधारण साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान शहरातील गुरव गल्लीत राहणारे सोमनाथ निंबा महाजन यांच्या घरातील गॅस सिलेंडर लिकेज झाल्यामुळे अचानक आग लागली होती. या आगीत श्री. महाजन यांचे साधारण चार लाखाचे नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजू महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासूदेव चौधरी, धीरेंद्र पुरभे यांनी धाव घेतली आणि आग विझवण्याससह आर्थिक मदत केली. तर गुलाबराव वाघ व निलेश चौधरी यांनी तहसील कार्यालय व पालिका प्रशासनास पंचनामा संदर्भात सूचना केल्या. दुपारी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे देखील आपदग्रस्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत. दरम्यान, संपूर्ण नुकसान भरपाई मिळवून देण्यास शिवसेना बांधील असल्याचे आश्वासनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी यावेळी आपदग्रस्त कुटुंबियांना दिले.